बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष मा. श्री. प्रशांत श्रीकिसन अग्रवाल (चार्टर्ड अकौंटन्ट) यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कॉमर्स एंड मैनेजमेंटच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली तसेच इंस्टिट्युशन ऑफ चार्टर्ड अकौंटन्ट ऑपरेटिव कमिटीचे (पश्चिम विभाग ) सदस्य म्हणून निवड झाली आहे या बद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.
बँकेचे सन्माननीय संचालक श्री प्रकाश एकनाथ पाटील यांची जलगांव जिल्हा मजूर फ़ेडरेशनचे सभापति पदी निवड झाली आहे. या बद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.
कोव्हीड - १९ अंतर्गत शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन काळात रोजंदारी व हात मजुरी करणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ आली असताना अशा नागरिकांना बँकेने मदतीचा हात पुढे केला. दिनांक ३ एप्रिल २०२० रोजी उपविभागीय अधिकारी मा. राजेंद्र कचरे पाटील, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडें, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांचे उपस्थितीत गरिब नागरिकांना मोफत धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास मोहन अग्रवाल, सीताराम अग्रवाल, बबलू संघवी, माधवराव सिनकर, किशोर अग्रवाल, राजेश मोर, अंकित अग्रवाल, राजेश पटवारी, पप्पू मोरे, योगेश अग्रवाल व बँकेच्या कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केले. बँकेने केलेल्या या कार्यास सर्वच वर्तमान पत्राचे पत्रकार, वार्ताहर यांनी प्रसिद्धी देऊन सहकार्य केले या बद्दल बँक त्यांचे आभार व्यक्त करते.
दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका
© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.
रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस