Pachora Peoples Banner

एनईएफटी (नेफ्ट)

सर्व खातेदारांना विनंती आहे की, एनईएफटी आणि आरटीजीएस द्वारे अंतर्दिश निधी हस्तांतरणाकरता त्यांनी फक्त आपल्या 15 अंकी खाते क्रमांकाचाच उपयोग करावा.

इलेक्ट्रॉनिक पेमेंट उत्पादने – निव्वळ खाते क्रमांकाच्या आधारे अंतर्दिश व्यवहारांवर प्रक्रिया करणे.

पेमेंटच्या सूचना देताना अचूक माहिती देण्याची, विशेषतः लाभार्थ्याचा खाते क्रमांक अचूक टाकण्याची जबाबदारी निधी पाठवणाऱ्या/व्यवहार सुरू करणाऱ्या व्यक्तीवरच राहील. पेमेंट सूचनेमध्ये लाभार्थ्याचे नाव नमूद करणे बंधनकारक असले आणि निधी हस्तांतरणाच्या संदेशामध्येदेखील ते पुढे पाठवले जात असले, तरी निधी जमा करण्याकरता फक्त खाते क्रमांकावरच विश्वास ठेवला जाईल. ही गोष्ट शाखेमध्ये दिलेल्या विनंतीला व ऑनलाईन/इंटरनेटवरून दिलेल्या अशा दोन्हींनाही लागू असेल. (अधिक माहितीकरता रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक क्र. RBI/2010-11/235 DPSS (CO) EPPD No. / 863 / 04.03.01 / 2010-11 दि. ऑक्टोबर 14, 2010 पहा). त्यामुळे, फक्त लाभार्थी खातेक्रमांकाच्या माहितीच्याच आधारे निधी जमा केला जाईल, लाभार्थ्याच्या नावाचा उपयोग केला जाणार नाही. याकरता निधी पाठवणाराने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे पाठवताना लाभार्थ्याचा खातेक्रमांक देताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

द नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर सिस्टिम (एनईएफटी) ही प्रणाली किरकोळ ग्राहकांच्या व्यवहारांकरता सुरू करण्यात आलेली आहे. एनईएफटी व्यवहारांवर सर्व दिवशी ००.३० ते २४.०० या वेळात प्रत्येक अर्ध्या तासाने प्रक्रिया आणि सेटलमेंट केली जाते. एनईएफटीद्वारे बँकेचे ग्राहक दुसऱ्या बँकेतील लाभार्थ्याच्या खात्यामध्ये कितीही रक्कम (रू. २.०० लाखांपेक्षा अधिक देखील) पाठवू शकतात.

नेफ्ट व्हॅल्यू बँडकरता सेवा शुल्क प्रति नेफ्ट व्यवहार कमाल आकार
रू. १०,००० पर्यंत रू. २.५०
रू. १०,००० ते रु. १ लाख पर्यन्त रू. ५.०० (अधिक सेवा कर)
रू. १ लाख ते रु. २ लाख पर्यन्त रू. १५.०० (अधिक सेवा कर)
रु. २ लाख पेक्षा अधिक रू. २५.०० (अधिक सेवा कर)
DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस