Pachora Peoples Banner

आरंभ

पाचोरा पीपल्स बँकेची स्थापना १६ डिसेंबर १९६५ रोजी झाली असून आजपर्यंत पारदर्शक व्यवहार आणि विश्वसनियेतेच्या बळावर बँक सुव्यवस्थित आणि सुरळीतपणे सुरु आहे. बँक ६ शाखा आणि मुख्य कार्यालय यांच्या माध्यमातून कार्य करते. सर्व कार्यालये वातानुकूलित, सुसज्ज, पूर्णपणे संगणकीकृत आणि परस्पर जोडलेली आहेत.

प्रगतीची कास

बँकेची पहिली शाखा महाराष्ट्रातल्या कापूस, खाद्यतेले, केळी व सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात १६ डिसेंबर १९६५ रोजी उघडली गेली. सध्या जळगाव, भडगांव, शेंदुर्णी, नगरदेवळा आणि जामनेर येथे बँकेच्या शाखा आहेत.

दूरदृष्टी

सर्व दिशांनी उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आमच्या बँकेच्या प्रयत्नांमागे एका निश्चित परिप्रेक्ष्याची चालक शक्ती आहे जी आम्हाला प्रेरणा देत असते. आमची मूल्येच आमच्या विचारांना आणि कामाला दिशा देतात. आमची रणनीती तयार करण्यासाठी आणि ती अंमलात आणण्यासाठी ती आम्हाला जीवनशक्ती देतात. परिप्रेक्ष्य, मूल्ये आणि जीवनशक्ती या तिन्हींच्या संगमातूनच आमच्या बँकेची सर्वोच्च संभाव्यता साकार होईल.

संस्थेचे उद्दीष्ट

तंत्रज्ञान, व्यवस्था आणि मानव संसाधन, या तीन गोष्टी हातात हात घालून चालण्याकरीता अथक प्रयत्न करणे, त्यांच्या साहाय्याने असंख्य ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, उच्च नीतिमत्ता आणि सामाजिक बांधीलकी अंगिकारणे, नवी उत्पादने आणि प्रक्रियांचा सातत्याने विकास करणे व बँकेला सर्वश्रेष्ठ बनवण्याकरता गुणवत्ता, कार्यक्षमतेवर भर देणारा कर्मचारीवृंद विकसित करणे हे आमचे जीवितकार्य आहे.

उत्पादने आणि सेवा

आपल्या ग्राहकांपर्यंत विविध उत्पादने आणि सेवा उत्तम प्रकारे पोहोचवण्याकरता बँकेने एक परस्पर क्रिया युक्त असे संकेतस्थळ तयार केले आहे. बँकेने कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस) तंत्रज्ञानही यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या साह्याने बँक ग्राहकांना कुठल्याही शाखेतून बँकिंग करण्याची सेवा देते. ग्राहक बँकेच्या कुठल्याही शाखेतून रोख रकमेची देवाणघेवाण, हस्तांतरण, समाशोधन, प्रेषण इ. व्यवहार करू शकतात.

बँकिंग सेवा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याकरता, तसेच आर्थिक समाविष्टता (फायनान्शियल इन्क्लुजन) राष्ट्रीय ध्येय पूर्ण करण्याकरता बँकेने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना - (पीएमजेबीवाय) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना - (पीएमएसबीवाय) या योजनादेखील बँकेने कार्यान्वित केल्या आहेत.

बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या आरटीजीएस, नेफ्ट, त्वरित समाशोधन इ. अन्य सेवादेखील अंगिकारल्या/कार्यान्वित केलेल्या आहेत.

भविष्यावर दृष्टी

संभाव्य संधींचा विस्तार, निरंतर विकास आणि स्पर्धा यांचा विचार करून व नियामक अधिकरणांच्या मंजुरीने सर्व आनुषंगिक सेवा पुरवण्याद्वारे आपल्या भागधारक आणि ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची आणि एक सर्वांगीण वित्त पुरवठादार म्हणून समोर येण्याची बँकेची योजना आहे. ग्राहकांना जलद आणि सुलभ सेवा देण्याकरता बँकेने उच्च तंत्रज्ञानाची कास धरली आहे. दीर्घ कालावधीमध्ये ही सम्यक योजना बँकेला तिचा बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्यामध्ये आणि सर्व भागधारकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये साह्यभूत ठरेल.

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस