Pachora Peoples Banner

सभासद व भागभांडवल

वर्षअखेर भागभांडवल रु. ४८३.६२ लाख आहे. दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर एकूण भाग धारक सभासद संख्या १९८२६ आहे. नाममात्र सभासदाची संख्या २३७ आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनुसार भाग भांडवलात वाढ होणे आवश्यक असल्याने सभासदांना नम्र विनंती करण्यात येते की,आपल्या नांवावर रु. १००० पेक्षा कमी शेयर्स असल्यास बाकीची रक्कम भरून बॅंकचे भाग भांडवल वाढीस सहकार्य करावे.

राखीव व इतर निधी

बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असुन बँकेला होणाऱ्या सततच्या नफ्यातूनच बँकेच्या निधी मध्ये वाढ होत असते. अहवाल वर्षात बँकेच्या स्वनिधीत रु. ५२.४२ लाखाची वाढ होऊन आर्थिक वर्षा अखेर बँकेच्या एकूण स्वनिधी रु. ३४५६.९९ लाख झालेला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमा प्रमाणे भांडवल पर्याप्तता प्रमाण ९ टक्के पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. बँकेने हेच प्रमाण ३२.७१ टक्के राखले आहे. यामुळे बँकेची स्थिती भक्कम आहे.

ठेवी

बँकेची प्रगती हि प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. इतर बँकाच्या व्याज दाराशी तुलनात्मक असे मुदतीनुसार व्याज दर ठरविणे क्रमप्राप्त झाले आहे. यासाठी बँक नेहमीच व्याजदराचा आढावा घेऊन व्याजाचा दर निश्चित करीत असते.

दि. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. १४५९७.७५ लाख आहेत. कमी खर्चंच्या ठेवी मध्ये वाढ होणे महत्वाचे आहे. अशा ठेवींमध्ये CASA ठेवीचे प्रमाण १८.५२ टक्के आहे. मासिक ठेव योजनेत ठेवीवर मासिक व्याज दिले जात असून याचा फायदा असंख्य निवृत्त ठेवीदार व जेष्ठ नागरिक घेत आहेत. बँकेने नवीन ठेव योजना सुरु केलेल्या आहेत. या नवीन योजनेमुळे ठेवी मध्ये वाढ होत आहे.

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२५ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस